नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती मार्ग (महाराष्ट्र समृध्दी महामार्ग)
नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती मार्ग (महाराष्ट्र समृध्दी महामार्ग) व नवनगरे यासाठी संपादीत करावयाच्या जमिनींसाठी उपलब्ध पर्याय व त्यानुसार मिळणारा मोबदला याचा तुलनात्मक अभ्यास करून योग्य पर्यायाची निवड करणे संबंधीत शेतक-यास सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी मोबाईल ॲप प्रणाली विकसीत केली आहे. रस्त्याच्या आणि नवनगराच्या आखणीमध्ये समाविष्ट होणा-या जमिनीसंबंधीची व शीघ्र सिध्द गणकाचे दराची माहिती सदर प्रणालीत योग्यरित्या भरल्यास देय व अनुज्ञेय लाभाचे पर्याय निकाल विभागात पाहता येतील व त्याआधारे शेतक-यांना योग्य पर्यायाची निवड करता येईल.
त्यासाठी http://www.mahasamruddhimahamarg.com/ या लिंकवर जा व योग्य पर्याय निवडून महामंडळाच्या उपक्रमात सहभागी व्हा.